शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (07:34 IST)

गोकुळच्या दुधाचा दर आता 58 रुपये प्रति लिटर

gokul milk
गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर शेतकर्‍यांकडून करण्यात येणाऱ्या दूध खरेदी दरात गोकुळने दोन वेळा प्रति प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ दिली होती. पण त्यावेळी दूध विक्री दरात वाढ करण्यात आली नव्हती. त्याचबरोबर रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दरही भरमसाठ वाढल्याने गोकुळच्या वाहतूक खर्चामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 
 
त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर चार रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 54 रुपये प्रति लिटर असलेल्या गोकुळच्या दुधाचा दर आता 58 रुपये प्रति लिटर असा होणार आहे. शनिवार पासून ही दरवाढ सर्वत्र लागू होणार आहे.