सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (23:05 IST)

PM POSHAN:सरकारी शाळेतील मुलांना 5 वर्षांसाठी मोफत मध्यान्ह भोजन मिळेल, मोदी सरकारची नवीन योजना

केंद्र सरकारने पीएम-पोषण योजना सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे देशभरातील 11.2 लाखांहून अधिक सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन सुनिश्चित केले जाईल.
 
माध्यमांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले की ही योजना 5 वर्षे चालेल आणि 1.31 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. याव्यतिरिक्त, केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय निर्यात विमा खाते (NEIA) योजना चालू ठेवण्यास आणि 5 वर्षात 1,650 कोटी रुपयांच्या अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे.