बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 27 जून 2020 (14:02 IST)

1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार

1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होण्यात शक्यता आहे. डेबिट कार्ड वापरुन एटीएममधून पैसे काढणार्‍यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन एप्रिल, मे, जून हे तीन महिने काही नियम शिथिल करण्यात आले होते. मात्र 1 जुलैपासून हे नियम लागू होणार आहेत. अर्थमंत्रालयाने  कोरोना काळात एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कावर सूट दिली होती. एप्रिल, मे, जून हे तीन महिने ही सूट होती. त्यामुळे मध्यवर्गियांना मोठा दिलासा मिळाला  होता. मात्र आता 30 जूनला ही सूट संपते आहे. त्यामुळे पूर्वीचे जे नियम होते तेच 1 जुलैपासून लागू होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने इतर  बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यावरच्या चार्जेसचा समावेश आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या बँकेच्या एटीएममधूनच पैसे काढणे सोयीचे ठरणार आहे. उदा. तुमचे अकाऊंट एचडीएफसी बँकेत आहे आणि तुम्ही एसबीआय किंवा इतर बँकेतून पैसे काढले तर तो व्यवहार सशुल्क असू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने प्रमुख शहरांमध्ये महिन्याभरता आठवेळा पैसे काढण्याची मुभा दिली आहे.
 
त्यानंतरच्या प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी शुल्क आकारले जाईल. एसबीआने जे आठ व्यवहार मोफत ठेवले आहेत त्यानुसार तुम्ही आठपैकी 5 वेळा एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढू शकता तर तीनवेळा इतर कोणत्याही बँकेच्या एटीममधून पैसे काढू शकता. महानगर नसलेल्या शहरांध्ये हे प्रमाण 10 व्यवहार असे एसबीआयने ठेवले आहे. ज्यामध्ये 5 वेळा एसबीआय एटीएम आणि 5 वेळा दुसर्‍या  कोणत्याही बँकेच्या एटीएमचा समावेश आहे. त्यानंतरच्या व्यवहारांसाठी साधारण 28 रुपये शुल्क लागण्याची शक्यता आहे.