1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

होंडा सिएल उत्पादन वाढवणार

लक्झरी कार तयार करणाऱ्या होंडा सिएलला आगामी काळात कारची विक्री वाढण्याची आशा आहे. कंपनीने यासाठी आपल्या प्रकल्पांमधील उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, प्रकल्पांमध्ये दोन पाळ्यांमध्ये काम करण्यात येणार आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष जनेश्वर सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रेटर नोएडा येथील प्रकल्पात एक तारखेपासून दोन पाळ्यांमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. तीन आठवड्यांसाठी प्रकल्पात अतिरिक्त काम करण्यात येत असून, आगामी काळात भारतातील सण आणि उत्सवांमध्ये कारची विक्री वाढण्याची आशा कंपनीला आहे.

देशभरातील होंडा शोरूम्समध्ये ग्राहकांनी बुकिंग सुरू केली असून, बुकिंग आणि उत्पादन यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न कंपनीने सुरू केला आहे.