1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (11:10 IST)

आदेश भाऊजी देणार 11 लाखाची पैठणी

झी मराठी वरील लोकप्रिय असलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. हा मराठी  वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम तब्बल 15 वर्षांपासून महाराष्ट्राचा घरा - घरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाला संचालन करणारे आदेश बांदेकर म्हणजे आपले सर्वांचे लाडके भाऊजी महाराष्ट्राच्या घरा -घरात पोहोचले . केवळ महाराष्ट्रातच न्हवे तर त्यांनी हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या बाहेर देखील प्रसिद्ध केला. या कार्यक्रमात अति उत्साहाने महिला वर्ग कुटुंबियांसह भाग घेतात. आणि त्यापैकी काही विजयी होतात. विजयी झालेल्या स्पर्धकाला भाऊजी पैठणी देतात. 
 
आता या कार्यक्रमाचा एक खास भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'महामिनिस्टर' असे या पर्वाचे नाव असेल. या पर्वात महामिनिस्टरचा शोध घेण्यासाठी भाऊजी महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन पैठणीचा खेळ खेळणार आणि त्यात जे स्पर्धक जिंकणार त्याला महमिनिस्टरचा 'किताब आणि तब्बल 11 लाखाची सोन्याचे जर असलेली पैठणी देण्यात येणार. हा कार्यक्रम येत्या 11 एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.