Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मला माझा आवाज ऐकण्याची दृष्टी अनहद नाद नाटकाने दिली आहे....

Updated: गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (11:47 IST)
 
या नाटकामध्ये कलाकार अश्विनी नांदेडकर , सायली पावसकर , कोमल खामकर, योगिनी चौक आणि तुषार म्हस्के आपल्या कलेतून हे नाटक रंगमंचावर सादर करत आहेत.
 
१२ ऑगस्ट १९९२ पासून “ थियेटर ऑफ रेलेवंस” रंग सिद्धांत जनतेसाठी ‘जन चिंतन मंच ‘ म्हणून उदयास आला आणि १२ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या रंग दर्शन यात्रेची २५ वर्षे पूर्ण केली. या २५ वर्षात “थियेटर ऑफ रेलेव्हन्स” नाट्य दर्शनाने , रस्ते, चौक,गावे, आदीवासी पाडे आणि शहरांतून आपली वैश्विक उड्डाण भरून आपली जागतिक स्वीकृती मिळवली आहे.
 
‘थिएटर ऑफ रेलेवंस’ चे सिद्धांत
१) ‘थिएटर ऑफ रेलेवंस’ हा एक असा रंगमंच आहे, ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि अधिक उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.
२) कला ही बाजारीकरणासाठी  नसून समाजा प्रती स्वतःची जबाबदारी स्वीकारेल. लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल.
३) जे मानवी गरजा भागवेल आणि अभिव्यक्तीचे एक माध्यम म्हणून उपलब्ध असेल.
४) जे स्वतःचा , बदलाचे माध्यम म्हणून शोध घेईल. स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे नेईल.
५) जे मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे माध्यम वा पद्धती बनेल.
 
( रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस” चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस” चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस” नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे)
 
आज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात,  मानवाचे मानवी असणे हे आव्हान झाले आहे. नाटक “गर्भ”, “अनहद नाद – Unheard Sounds of universe” आणि “न्याय के भंवर में भंवरी” या नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आतील मानवाचा आवाज ऐकवण्यासाठी,मुंबईत १५, १६ आणि १७ नोव्हेंबर २०१७ रोजी तीन दिवसीय ‘नाट्य उत्सव’ साजरा करण्याचे आयोजन केले आहे . आपल्या अर्थपूर्ण आणि सृजनात्मक, रचनात्मक सहभागाची अपेक्षा आहे . कारण “थियेटर ऑफ रेलेवंस” रंग सिद्धांतानुसार ,’प्रेक्षक’ हा पहिला आणि सशक्त रंगकर्मी आहेत.
 
मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ” आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी”नाटकांची प्रस्तुती शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम) मुंबई येथे अनुक्रमे १५ , १६ आणि १७ नोव्हेंबर २०१७  रोजी सकाळी ११ वाजता होईल.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

वीकेंड ट्रिपसाठी पुण्याजवळील कमी प्रसिद्ध पण ५ सुंदर ठिकाणे

मराठी तरुण अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविरोधात शालिनी पांडेने आवाज उठवला

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

Lock Upp 2: हर्षद चोप्रा पहिला फायनलिस्ट ठरला, शिवांगी जोशी धक्कादायक एलिमिनेशनला सामोरे गेली

पुढील लेख
Show comments