शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2023 (08:02 IST)

दिग्दर्शक-लेखक स्वप्निल मयेकर यांचं निधन,मराठी सिनेसृष्टीत हळहळ

Swapnil Mayekar Death
‘मराठी पाऊल पडते पुढे’ चित्रपटाचे दिग्दर्शक-लेखक स्वप्निल मयेकर यांचं निधन झालं आहे.वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.  पहाटे चेंबूर घाटलागाव येथे राहत्या घरी निधन झाले आहे. स्वप्नीलच्या मृत्यूने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वप्नील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. स्वप्नील यांनी यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
 
गेले काही महिने ते आजारी होते. स्वप्नीलचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट आज (5 मे ) रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. हा त्यांचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता. ‘हा खेळ संचितांचा’ या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं.त्याशिवाय त्यांनी एका भोजपुरी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor