1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (12:10 IST)

अरे लूट थांबवा रे.. हायवे टोलवर संतापले सौमित्र

Kishor Kadam Saumitra
लोकप्रिय अभिनेते कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चांगलीच चर्चेत आहे. किशोर कदम यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे संदर्भात एक पोस्ट शेअर करत सरकारला काही सवाल केले आहेत. 
 
त्यांनी हायवेवर आकारल्या जाणाऱ्या टोलसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. सौमित्र यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी आपली मते मांडली आहेत. सौमित्र यांची पोस्ट या प्रकारे आहे-
 
मुंबई से पुणे जाते समय एक्सप्रेस हाईवे पर 240 टोल लेते हैं.. लोनावाला में मन की शांति से कुछ खाने आते हैं तो फिर 240 क्यों लेते हैं आदि?
टोल के नाम पर चल रही लोगों की इस लूट को रोकने की बात किसी ने की क्या?
और एरवी यात्रा करने के बाद फास्ट टैग्स के माध्यम से पैसे खो चुके मैसेज एक-दो घंटे बाद आते रहते हैं। वह पैसा कहाँ जाता है?
अरे लूटपाट बंद करो ।।
लोग कुछ नहीं बोलते इसलिए कितना लूटोगे
शिकायत तो किससे करें?
इसके जिम्मेदार अधिकारी कौन हैं?
 
सध्या सौमित्र यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर पाठिंबा देत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी नुकतंच त्यांना टोलनाक्यावर अडवल्याने गोंधळ उडाला होता. याच सर्वांच अर्थ टोलनाक्याच्या समस्यांचा त्रास फक्त सामान्य माणसांना नसून राजकीय मंडळी आणि इतर सेलिब्रिटींना देखील होत आहे. अनेकदा विनाकारण दोन वेळा टोल द्यावा लागत असल्यामुळे सर्वांच्याच खिशाला मोठा भुर्दंड बसतो. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋतुजा देशमुखने हिने टोलनाक्यावर अधिक टोल कापत असल्यामुळे व्हिडीओच्या माध्यमातून तक्रार केली होती.