रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

गुगल ट्रेण्ड्समध्ये ‘तुला पाहते रे' पुढे

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेच्या कथेमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. 

नुकतीच राजनंदिनीची या भूमिकेची एण्ट्री झाली आहे. अभिनेत्री शिल्पा तुळस्कर राजनंदिनीची भूमिका साकारणार असून सोशल मीडियावरही ‘तुला पाहते रे’मधील राजनंदिनीची जोरदार चर्चा आहे.

इतकंच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही या मालिकेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनासुद्धा मागे टाकलं आहे. ही मालिका केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात यांसारख्या राज्यांतही लोकप्रिय आहे.