Last Modified मंगळवार, 17 मे 2022 (08:25 IST)
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक करून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, याप्रकरणी शेलारने एनएम जोशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सुशांत शेलार म्हणाला, रविवारी
मध्यरात्री 2 च्या दरम्यान अज्ञाताने माझ्या पार्क केलेल्या गाडीवर दगडफेक केली. त्यानंतर गाडीची तोडफोड करण्यात आली. यात गाडीची समोरील काच पूर्णपणे फुटली आहे. संबंधिताने गाडीच्या पुढे बॅरिकेट्स लावून पलायन केले. त्याने गाडीची तोडफोड का केली, याचे कारण मला माहिती नाही. पण मी याप्रकरणाची रितसर तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्हीत ही घटना स्पष्ट दिसत असून, पोलीस याबाबत तपास करत आहेत.