सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2023 (09:51 IST)

तू चाल पुढं फेम अभिनेता ध्रुव दातार लग्नाचा बेडीत अडकला

सध्या लग्न सराय सुरु  आहे. आता तू चाल पुढं फेम अभिनेता ध्रुव दातार लग्नाच्या बेडीत अडकला आहे. ध्रुव ने नातेवाईक, कुटुंबिय, मित्र परिवाराच्या उपस्थितीत आपल्या मैत्रिणी अक्षता तिखेशी लग्न केलं. ध्रुवचा साखरपुडा 14 मे रोजी झाला. ध्रुव आणि अक्षतांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहे. दोघेही पारंपरिक लूक मध्ये छान दिसत होते. ध्रुवने सदरा घातला होता. तर अक्षताने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या पूर्वी ध्रुव आणि अक्षतांच्या हळदी समारंभाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. या जोडप्याला चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिनेता ध्रुव हा तू चाल पुढे या मालिकेतून लोकप्रिय झाला. सध्या ध्रुव लक्ष्मीच्या पावलांनी या पालिकेत काम करत आहे. तर अक्षता ही नृत्यांगना असून तिचे स्वतःचे डान्स क्लास आहे. ती सध्या कोरिओग्राफर म्हणून काम करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit