बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

अभिनेता विनीत भोंडे लग्नाच्या बेडीत अडकणार

'चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातला अभिनेता  विनीत भोंडे आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विनीतचा नुकताच त्याचा साखरपुडा झाला.

मुळचा औरंगाबादचा असलेल्या विनीतच्या भावी वधूचे नाव सोनम पवार आहे. सोनम मुळची सोलापूरची असून सध्या पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे.

मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा झाला. विनीत आणि सोनम हे अरेन्ज मॅरेज असून येत्या ४ मार्चला औरंगाबाद येथे दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.