मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (12:41 IST)

सलग दुसऱ्या वर्षी स्वप्नील बनला ‘मॅक्स’क्लोथिंगचा ब्रॅण्ड़ अॅम्बेसिडर

महाराष्ट्राचा लाडका आणि चार्मिंग अभिनेता स्वप्नील जोशी हा पुन्हा एकदा ‘मॅक्स’या लाईफस्टाईल क्लोथिंगचा ब्रॅण्ड़ अॅम्बेसिडर बनला आहे. ब्रॅण्ड़ अॅम्बेसिडर बरोबरच ‘मॅक्स’स्प्रींग समर लूकच्या डिझाईनमध्ये देखील स्वप्नीलचा महत्वाचा वाटा आहे. मागच्या वर्षीच्या स्वप्नीलच्या कलेक्शनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे ‘मॅक्स’आणि ‘जीसीम्स’यांनी स्वप्नीलाच पुन्हा ब्रॅण्ड़ अॅम्बेसिडर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वप्नील हा युथ स्टाईल आयकॉन असल्यामुळे मागच्या वर्षी ‘मॅक्स’ब्रॅण्ड़ला त्याचा फायदा झाला. येणाऱ्या नवीन स्प्रिंग आणि यंग कलेक्शनसाठी नुकतेच स्वप्नीलने फोटोशूट केले. स्वप्नील सर्वांचाच लाडका अभिनेता असल्याने फॅन्स् लगेच त्याचे अनुकरण करताना दिसतात.
 
याबद्दल स्वप्नील जोशी सांगतो, "‘मॅक्स’सोबत दुसऱ्यांदा असोसिएट करताना मला फार आनंद होत आहे. आणि गम्मत म्हणजे यावेळेसची कल्पना फार वेगळी आहे जिथे ‘मॅक्स’-इन- स्टोअर गेम अॅपलीकेशनद्वारे मला माझ्या चाहत्यांना भेटता येणार आहे. अश्या प्रकारे चाहत्यांना भेटण्याचा योग एका मराठी अभिनेत्याला पहिल्यादाच मिळणार आहे". स्वप्नीलच्या हटके स्टाईलची क्रेज देखील तरुणांमध्ये जास्त असल्यामुळे ‘मॅक्स’च्या स्टोरमध्ये एक अॅप तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना आवडणारे कपडे मोबाईलद्वारे स्वप्नीलवर ट्राय करू शकतात व त्यावर स्वप्नीलची प्रतिक्रिया मिळवू शकता. अश्या प्रकारे आपली प्रतिक्रिया देण्याची युक्ती स्वप्नीलच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल ह्यात शंका नाही.