सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 24 जानेवारी 2017 (14:30 IST)

यशवंत फिल्म फेस्टिवल मध्ये दिग्गजांची मांदियाळी

बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नांदी २० जानेवारी रोजी झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म  फाऊंडेशन , मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. हा चित्रपट महोत्सव २० जानेवारी ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान  चित्रपट रसिकांसाठी असणार आहे . महोत्सवाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल शरद पवारांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावर्षी `स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेस’ प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे  व्याख्याते म्हणून होते.  स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘’मी सिनेमाकडे कसा पाहतो’’  ह्या विषयावर व्याख्यान देताना म्हणाले, ''हिंदी चित्रपट सृष्टीतील स्त्रिया साचेबंध भूमिकांमध्ये दाखवल्या जातात .तो  साचा स्मिता पाटील यांनी मोडला.'' कधी वास्तवावर आधारित  घटना  सिनेमामध्ये  दाखवले जाते तर कधी सिनेमा पाहून अनेक घटना  वास्तवामध्ये  घडतात. स्मिता पाटीलने अवघ्या १० वर्षात खूप  वेग- वेगळ्या भूमिका केल्या. आजही आपल्याला त्याच्या भूमिका आणि त्या भावतात.  अभिनय  हे माझे पहिले प्रेम आहे तर दिग्दर्शन करणे ही माझी आवड आहे असे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सांगायला विसरले नाहीत. 

तसेच चिली देशातील संगीत दिग्दर्शक जॉर्ज ऍरिगडा यांचा मास्टर क्लास ‘म्युझिक ऍन्ड साऊंड इन सिनेमा’ या विषयावर २1 जानेवारी सायंकाळी झाला.चित्रपटांमध्ये कशा प्रकारचे  संगीत वापरले जाते. संगीत वापरताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो,या संगीतक्षेत्रातील महत्वाच्या गोष्टी   त्यांनी सांगितल्या. विविध चित्रपटांचे दृश्य  दाखून त्यांनी चित्रपटातील पाश्वसंगीत  मधील फरक प्रेक्षकांना समजावून दिले.