1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 30 मार्च 2009 (19:56 IST)

आयपीएल विदेशात होणे फायदेशीर:इरफान

इंडियन प्रीमियल लीग (आयपीएल) विदेशात होणे फायदेशीर ठरणार आहे. यामुळे आयपीएलचे वैश्विकरण होणार असल्याचे भारताचा अष्टपैलू इरफान पठाण याने सांगितले.

किंग्स इलेवन पंजाबकडून खेळणारा इरफान याने सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत आयपीएल होणे महत्वाचे होते. दर्शकांना मैदानावर सामने पाहण्यास मिळणार नसले तरी टीव्हीवरुन त्याच्या आनंद घेता येईल.