सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

तेव्हा ड्रेसिंग रुमचं वातावरण होतो वाईट: शोएब

कराची: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं मॅच फिक्सिंगविषयी खळबळजनक वक्तव्यं केली आहेत. अख्तरनं दावा केला आहे की, 1996 मध्ये मॅच फिक्सिंगची सर्वात जास्त चर्चा होती. त्यावेळी ड्रेसिंग रुममधलं वातावरण क्रिकेटसाठी अजिबात पोषक नव्हतं.
 
अख्तरनं पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, ‘माझ्यावर विश्वास ठेवा की, 1996 साली ड्रेसिंग रुममधील वातावरण अतिशय वाईट होतं. क्रिकेटशिवाय तिथं बरंच काही सुरु होतं. त्यामुळे क्रिकेटवर लक्ष देणं फार कठीण होतं. ते वातावरण अतिशय खराब होतं.’ असं अख्तर म्हणाला.
 
सध्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियांदाद आणि शाहीद आफ्रिदी यांच्यात बराच वाद-विवाद सुरु आहे. दोघंही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. अशावेळी अख्तरनं केलेलं हे वक्तव्य फारच महत्वपूर्ण आहे.
 
दरम्यान, अख्तरनं स्पष्ट केलं आहे की, त्याला आनंद वाटतो आहे की, मियांदाद आणि आफ्रिदीमधील वाद मिटला आहे.