1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: कराची , बुधवार, 1 डिसेंबर 2010 (14:38 IST)

पाच पाक क्रिकेटपटूंना डच्चू?

आगामी विश्वचषक सामन्यांमध्ये सलमान बट, मोहंम्मद आसिफ, मोहंम्मद आमिरसह पाच खेळाडूंना न घेण्याचे आदेश आयसीसीने दिल्याने पीसीबीने या खेळाडूंना डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पाचही खेळाडू फिक्सींचे मुख्य आरोपी आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेदरम्यान या पाच जणांविरोधात चौकशीही करण्‍यात आली होती. त्यांना आता आयसीसीने आरोपातून मुक्त केले असले तरी या पाच जणांचा समावेश आगामी विश्वचषक सामन्यांसाठी करु नये असे आयसीसीने पाकला सांगितले आहे.