द. आफ्रिका चोकर्स, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये
पूर्व चॅम्पियन्स भारतीय संघाने गोलंदाजीचे घातक प्रदर्शन आणि यानंतर गब्बर शिखर धवल (78) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद 76) यांच्य दबंग अर्धशतकाने विश्व नंबर एकचा संघ दक्षिण आफ्रिकेला रविवारी झालेल्या सामन्यात आठ विकेट ने धुळचारत शानदारपणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
ओव्हलच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या या सामन्यामध्ये शिखर धवन याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ओव्हलच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी एक धमाकेदार खेळी करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. धवने सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकून हा विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात एक हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजामध्ये धवन आता शिखरावर पोहोचला आहे. आयसीसी स्पर्धेमध्ये शिखर धवनने सर्वाधिक कमी डावात एक हजार धावा पार करण्याचा भीमपराक्रम आपल्या नावे केला आहे. 16 डावामध्ये त्याने हा पराक्रम केला आहे. तर हाच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरने 18 इनिंगमध्ये केला आहे. सौरव गांगुली, हर्षल गिब्स आणि मार्क वॉ यांना हा 1000 रन्स करण्यासाठी 20 इनिंग्स खेळाव्या लागल्या होत्या.