शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (11:10 IST)

कर्णधार विराट कोहली हा चॅम्पियन प्लेयर - हरभजन सिंग

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा चॅम्पियन प्लेयर आहे. अशा शब्दांत दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंगने कोहलीचे कौतुक केले. पुर्यात आयोजित लिटरेचर फेस्टिल 'स्पोर्टल'मध्ये भज्जी बोलत होता. सध्याच्या विराटचा फॉर्म अप्रतिम आहे, विराट फलंदाजीमधील सर्व विक्रम मोडेल, असा विश्वासही हरभजनने व्यक्त केला. 
 
विराट कोहलीच्या भन्नाट फॉर्ममुळे क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकरसोबत विराटची तुलना व्हायला लागली आहे, असाच एक प्रश्न भज्जीला विचारण्याच आला. मास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यातील सर्वोत्कृष्ट कोण? असा गुगली भज्जीला टाकण्यात आला. त्यावर कोहली हा चॅम्पियन प्लेअर आहे असे तो म्हणाला मात्र, सचिनच नेहमी नंबर वन राहील हे सांगायला तो विसरला नाही. 
 
विराट फलंदाजीमधील सर्व विक्रम मोडेल, अशी अपेक्षा त्याने यावेळी व्यक्त केली पण सचिन सचिनच राहील असे तो म्हणाला. विराट आणि माझ्यासह देशातील बहुतांश जणांनी सचिनला पाहूनच खेळण्यास सुरुवात केली. तुम्ही विराटला विचारले तर तोही हेच म्हणेल असे भज्जी म्हणाला.