गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (13:06 IST)

Hardik Pandya Marriage:आज हार्दिक पांड्या पुन्हा बोहल्यावर

Hardik Pandya Marriage:व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, हार्दिक पांड्या आणि नतासा स्टॅनकोविक (Hardik Pandya wife)पुन्हा एकदा एकमेकांशी लग्न करणार आहेत (Hardik Pandya Wedding) . भारतीय क्रिकेटपटूही त्यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी उदयपूरला पोहोचल्याचे दिसत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मंगळवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्यानंतर, नवविवाहित जोडपं केएल राहुल आणि अथिया शेट्टी देखील विमानतळावर स्पॉट झाले, ते उदयपूरला जाण्यासाठी फ्लाइट पकडताना दिसत आहेत. 
 
 अथिया शेट्टीने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाचा डेनिम जॅकेट घातला होता. केएल राहुल पांढऱ्या टी-शर्ट आणि कार्डिगन आणि ग्रे ट्रॅक पॅंटमध्ये होता. दोघेही घाईत दिसले, पण पापाराझीसाठी पोझ देण्यासाठी क्षणभर थांबले. दोघांनीही प्रवासासाठी ब्लॅक स्लिंग बॅग होत्या. “सब हार्दिक की शादी में जा रहे है (प्रत्येकजण हार्दिक पांड्याच्या लग्नाला जात आहे),” एका चाहत्याने त्यांच्या एकत्र व्हिडिओवर टिप्पणी केली.
 
हार्दिकने डीजे वाले बाबू फेम डान्सर नताशा स्टॅनकोविकसोबत लग्न केले आहे. तिचा दोन वर्षांचा मुलगाही आहे. आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ते उदयपूरमध्ये लग्नाचे विधी पूर्ण करणार आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, नतासा आणि हार्दिक ख्रिश्चन पंथानुसार लग्न करणार आहेत. हळदी, मेहंदी, संगीत या पारंपरिक समारंभांचेही नियोजन करण्यात आले आहे.
 
मंगळवारी सकाळी विराट आणि अनुष्का विमानतळावर कॅज्युअलमध्ये दिसले. तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोमवारी हार्दिक आणि नताशा मुंबई विमानतळावर त्यांचा मुलगा अगस्त्य, भाऊ कृणाल पांड्या, त्याची पत्नी पंखुरी शर्मा आणि मुलगा कवीर यांच्यासोबत दिसले.