सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: चंदीगड , शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (13:37 IST)

हरमनप्रित कौर 1 मार्चपासून पंजाब पोलिसात रुजू होणार

भारतीय महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार हरनप्रित कौर ही येत्या 1 मार्च रोजी पंजाब पोलीस दलामध्ये पोलीस उपअधीक्षक पदाचा भार स्वीकारणार आहे. भारतीय रेल्वेने तिला रेल्वेच्या सेवेतून मुक्त केल्याने हे शक्य होणार आहे. ती पंजाब पोलीसदलात सेवा करू इच्छित असल्याची बाब मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी रेल्वे मंत्रालयासमोर स्पष्ट केली होती. त्यानंतर तिला रेल्वेतून सेवामुक्त करण्यात आले. ती आता पोलीस दलाचा भाग होणार असल्याने मुख्यमंत्री सिंह यांनी जाहीर आनंद व्यक्त केला.