हाय बेबी स्वीटहार्ट हनीमून झाला का? विराटला तिने विचारला प्रश्न
विराट कोहली सध्या प्रसिद्धीच्या ७ व्या आसमानवर आहे. त्यामुळे त्याच्या सोबत नाव जोडून अनेक प्रसिद्ध होत आहे. आता या भर पडली आहे ती ड्रामा क्वीन राखी सावंत हिची. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. राखीच्या सोशल मीडियावर कॉमेंटला घेऊन चर्चा जोरात सुरु आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता त्यात फोटोला राखीने दिलेली कॉमेंट पाहून विराटचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौर्यावर असून दोन एकदिवसीय सामने जिंकून हा संघ तिसर्या सामन्यासाठी तयारी करत आहे. कप्तान विराट संघासह केपटाऊनला पोहोचला. विराटने तेथील एका लोकेशनचा फोटो पोस्ट केला. या फोटोला तुफान कॉमेंट्स मिळाले असून राखीचं वेगळचं सुरु आहे तिने विराटला 'हाय बेबी स्वीटहार्ट हनीमून झाला का? असा थेट प्रश्नच विचारला आहे. युजर्सनी राखीला ट्रोल करणे सुरू केले आहे.