1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 10 मार्च 2021 (12:51 IST)

आयसीसी फलंदाजी टी-20 क्रमवारी : शेफाली वर्माची दुसर्यास्थानी झेप

भारताची युवा स्फोटक फलंदाज शेफाली वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिलांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत दुसर्या स्थानावर पोहोचली आहे. तसेच या क्रमवारीत संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना सातव्या व जेमीमा रॉड्रीग्ज नवव्या स्थानावर आहे.
 
आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत फलंदाजांमध्ये शेफालीच्या नावे 744 गुण झाले आहेत. ती अव्वलस्थान काबीज केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीपेक्षा (748) चार गुणांनी पिछाडीवर आहे. तिच्याशिवाय अव्वल दहामध्ये मंधाना (643) व रॉड्रीग्ज (693) यांचाही समावेश आहे. या क्रमवारीत न्यूझीलंडची सोफी डिवाइन (तिसर्या) स्थानी), ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग (चौथ्या स्थानी) व एलिसा हिली (पाचव्या स्थानी) यांनी एक-एक स्थानांची सुधारणा केली आहे.
 
गोलंदाजी क्रमवारीत दीप्ती शर्मा (सहावे स्थान) फिरकीपटू राधा यादव (आठवे स्थान) व पूनम यादव (नववे स्थान) अव्वल 10 मध्ये सामील आहेत. इंग्लंडची सोफी एकलेस्टन (799) गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तिच्यानंतर दुसर्या( स्थानी दक्षिण आफ्रिकेची शबनम इस्माइल (764) हिचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दीप्ती शर्मा अव्वल 10 मध्ये सामील असलेली एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. ती 302 गुणांसह चौथ्या  स्थानी आहे.