शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (15:47 IST)

IND Vs WI, T20 Series : के एल राहुल आणि अक्षर पटेल T20 मालिकेतून बाहेर

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार के एल राहुल आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी T20I मालिकेतून वगळण्यात आले आहे. या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांचा बदली संघात समावेश करण्यात आला आहे. 
 
या महत्त्वाच्या बदलाची माहिती बीसीसीआयने शुक्रवारी दिली. "उपकर्णधार के एल  राहुल आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांना 16 फेब्रुवारी 2022 पासून कोलकाता येथे होणार्‍या वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या T20I मालिकेतून वगळण्यात आले आहे," असे भारतीय बोर्डाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
त्यात पुढे म्हटले आहे की 9 फेब्रुवारी 2022 रोजी दुस-या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलला वरच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ताण आला होता, तर अक्षर कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर पुनर्वसन प्रक्रियेतून जाईल. दोन्ही खेळाडू आता फिटनेससाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जातील.”
 
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 16, 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. 
 
भारताचा T20 संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा