शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बंगळुरू , मंगळवार, 7 मार्च 2017 (15:53 IST)

गोलंदाजांचे कमाल, भारताने जिंकला बंगळुरू टेस्ट

बंगळुरू टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजांनी कमालीचे प्रदर्शन करून ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव केला. 188 धावांचे लक्ष्य ठेवून  मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाई संघ दुसर्‍या डावात 112 धावांमध्ये ढेर झाला. अश्विनने 41 धावांवर सहा विकेट घेतले. गोलंदाजांचे नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या सामन्याला कलाटणी देणाऱ्या भागीदारीनंतर  रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी मात केली. या विजयाबरोबरच भारतीय संघाने पुण्यातील पराभवाची परतफेड करत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.