शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (20:23 IST)

India vs Sri Lanka : मालिकेतील वेळापत्रकात बदल, बीसीसीआयने केली ही मोठी घोषणा

बीसीसीआयने सोमवारी श्रीलंकेच्या भारत दौऱ्यातील बदल जाहीर केले. नव्या वेळापत्रकानुसार 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये खेळवला जाईल, तर पुढचे दोन सामने धर्मशाला येथे होणार आहेत. टी-20 मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून मोहालीत तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना दिवस रात्र खेळवला जाईल.
 
जुन्या वेळापत्रकानुसार श्रीलंकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात 25 फेब्रुवारीला होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याने होणार होती. पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे तर दुसरा कसोटी सामना मोहाली येथे 5 मार्चपासून होणार आहे. कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची होती. पहिला T20 मोहालीत, दुसरा धर्मशाला आणि तिसरा लखनौमध्ये खेळवला जाणार होता.
 
मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारताने अद्याप कोणत्याही फॉरमॅटसाठी संघ जाहीर केलेला नाही. या संघासोबतच बीसीसीआय कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराचीही घोषणा करणार आहे.