1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मे 2018 (08:58 IST)

आयपीएलची फायनल फिक्स असल्याचा दावा

ipl final  fix

आयपीएलचा दुसरा एलिमिनेटर सामना होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओनुसार आयपीएलची फायनल फिक्स असल्याचा दावा करण्यात येत आहे. शुक्रवारी अर्थात आज कोलकाता नाईट रायडर्स ( केकेआर) आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या लढतीत विजयी होणारा संघ २७ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज ( सीएसके) विरुद्ध फायनलमध्ये भिडणार आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रोमोनुसार सीएसके विरुद्ध केकेआर ही फायनल होणार आहे. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणाऱ्या‘हॉटस्टार’या कंपनीचा हा प्रोमो आहे. या प्रोमोमध्ये सीएसके आणि केकेआरचे काही खेळाडू दिसत आहेत. या व्हिडीओची अर्धवट क्लिपच सोशल मीडियावर आली आहे. या व्हिडीओबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हॉटस्टारने हा व्हिडीओ काढून टाकलाय. मात्र त्यापूर्वीच काही युझर्सनी हा व्हिडीओ फेसबुक तसेच ट्विटरवर शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओची कोणतीही खातरजमा करण्यात आलेली नाही.