1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: लंडन , शनिवार, 13 मार्च 2021 (11:31 IST)

आयपीएमुळे इंग्लंडचा संघ मर्यादित षटकांमध्ये अव्वलस्थानी

आयपीएल स्पर्धा आमच्यासाठी लाभदाक आहे. कारण या टी-20 लीगमधील इंग्लिश क्रिकेटपटूंच्या सहभागाने आमच्या राष्ट्रीय संघाला मर्यादित षटकांच्या  प्रकारात अव्वलस्थान प्राप्त करण्यात मदत मिळाल्याचे मत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक अॅ्श्ले जाईल्स यांनी मांडले.
 
जाईल्स म्हणाले, खेळाडूंसोबत चर्चाझाल्यानंतर मी त्यांना आपल्या वेळापत्रकावर लक्ष देण्यास प्रेरित केले. मी त्यांना सल्ले दिले नाहीत. आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्यास इच्छुक नाही.
 
आयपीएलकडे कानाडोळा करता येणार नाही. या टुर्नामेंटमुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे. मला वाटते की, आमच्या या संघातील 12 ते 16 खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी जात आहेत. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी आमच्या खेळाडूंना आयपीएलचा अनुभव देणे कठीण होते. आता आमच्या खेळाडूंना त्या स्पर्धेत खूप मागणी आहे. त्यामुळे कदाचित हेच मोठे  कारण असू शकते की, आम्ही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन्ही प्रकारात जगात अव्वल क्रमांकावर आहोत. इंग्लंडचे बारा खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत.
 
यामधील काही खेळाडूंचे करार हे कोटी रुपांमध्ये झालेले आहेत. यामध्ये जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, मोईन अली, सॅम कुरेन, टॉम कुरेन, डेव्हिड मलान यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू विविध संघांकडून खेळतील. तसेच आयपीएलला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे व 30 मे रोजी समारोप होणार आहे.
इंग्लंडचा न्यूझीलंडविरुध्दचा पहिला कसोटी सामना 2 जूनपासून सुरू होणार आहे. त्यावर जाईल्स म्हणाले की, आम्ही खेळाडूंना आयपीएलमध्ये पाठविण्यासाठी तयार आहोत. या दोन कसोटी सामन्यांचे वेळापत्रक नंतर तयार करण्यात आले. त्यामुळे जरी आमच्या खेळाडूंचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला तरी ते आपल्या टी20 संघासोबतच राहतील यावर सहमती झाली आहे.