रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (22:05 IST)

ICC Women's Ranking:ICC महिला क्रमवारीत मिताली राज सातव्या आणि मंधाना नवव्या स्थानावर

ICC महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत भारताची अनुभवी फलंदाज मिताली राज सातव्या आणि स्मृती मंधाना नवव्या स्थानावर कायम आहे.ऑस्ट्रेलियाची अ‍ॅलिसा हिली अव्वल स्थानावर असून त्यानंतर इंग्लंडची नताली स्किवर आहे.
 
न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत दोघांनी चमकदार कामगिरी केली होती. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानची सलामीवीर सिद्रा अमीनने 19 स्थानांची झेप घेत फलंदाजांच्या क्रमवारीत 35व्या स्थानावर पोहोचली आहे.
 
तीने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 72.66 च्या प्रभावी सरासरीने 218 धावा केल्या. त्यात श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 123 धावांची मॅच विनिंग खेळीही समाविष्ट आहे. श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टूही सहा स्थानांनी उल्लेखनीय झेप घेत 23व्या स्थानावर पोहोचली आहे.
 
32 वर्षीय फलंदाजाने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 101 धावा केल्या आणि तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 142 धावा केल्या. गोलंदाजांमध्ये इंग्लंडची सोफी एक्लेटन अव्वल, तर दक्षिण आफ्रिकेची शबनम इस्माईल दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाची जेस जोनासेन तिसऱ्या स्थानावर आहे.