गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 11 जुलै 2020 (12:32 IST)

‘वानखेडे'तील दोन जागा गावसकर दाम्पत्यांसाठी राखीव

भारतीय संघाचे माजी मराठमोळे कर्णधार सुनील गावसकर यांनी शुक्रवारी आपला 71 वा वाढदिवस  साजरा केला. मुंबई क्रिकेट आणि भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनने सुनील गावसकरांना वाढदिवशी मोठे गिफ्ट दिले आहे. वानखेडे मैदानाच्या प्रेसिडेन्ट बॉक्समध्ये सुनील गावसकर आणि त्यांच्या पत्नीसाठी दोन जागा कायम राखीव ठेवण्यात येणार आहेत.
 
वानखेडे मैदानावर गावसकर दाम्पत्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा अद्याप पूर्णपणे तयार झालेल्या नसल्याचे आम्हाला लक्षात आले. एमसीएचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत या दोन्ही जागा पुन्हा व्यवस्थित तयार करुन गावसकर दाम्पत्यासाठी राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने  प्रसिद्धीपत्रक जाहीर करत याबद्दल माहिती दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गरवारे पॅव्हेलिनमध्ये जे.आर. डी. टाटा, लता मंगेशकर आणि सुनील गावसकर यांच्यासाठी पहिल्या रांगेतल्या जागा राखीव ठेवल्या होत्या. मात्र 2011 विश्वचषकादरम्यान वानखेडे मैदानाचे नूतनीकरण करण्यात आले होते. ज्यावेळी या जागा गावसकरांच्या नावे करण्याचे काम प्रलंबित होते.
 
माझ्या वाढदिवशी एमसीएने मला सर्वात मोठे गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. एमसीएच्या वरिष्ठ कार्यकारिणीतले सदस्य नदीम मेनन आणि अजिंक्य नाईक यांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता. कसोटीत भारताकडून खेळताना 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारे पहिले फलंदाज असे अनेक विक्रम गावसकरांनी आपल्या कारकिर्दीत केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर गावस्कर समालोचन आणि वृत्तपत्रांमधून लिखाण करत असतात.