गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 2 जून 2020 (14:12 IST)

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचा अभिमान

भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्माची बीसीसीआयने या वर्षी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. त्याबद्दल रोहितने क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत. त्याने अपलोड केलेल्या एका व्हिडिओत म्हटले आहे की, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी माझी शिफारस केल्याचा मला खूप अभिमान वाटत आहे. 
 
मी बीसीसीआय, माझे सर्व सहकारी, सपोर्ट स्टाफ, चाहते व माझ्या परिवाराचे मला साथ दिल्याबद्दल आभार मानतो.