1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: लाहोर , मंगळवार, 23 जून 2020 (14:44 IST)

फिक्सिंगला नकार दिल्याने माझे करिअर संपवले : अकिब जावेदचा आरोप

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अकिब जावेदने मॅच फिक्सिंग करण्यास नकार दिल्यामुळे त्याचे करिअर संपवणत आले, असा आरोप केला आहे. 

अकिब जावेदने एका मुलाखतीत सांगितले की सलीम परवेझ हा व्यक्ती मॅच  फिक्सिंग करायचा. तो खेळाडू आणि बुकिंची भेट घडवून आणायचा. बर्‍याच लढतींमध्ये त्याने मॅच फिक्सिंग केले आहे. माझ्याकडेही तो मॅच फिक्सिंग करण्याचा प्रस्ताव घेऊन आला होता. पण मी त्याला नकार दिला. त्यानंतर मला राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले नाही. वयाच्या 25 व्या वर्षी माझे करिअर संपवण्यात आले. आपल्याला संघात न घेतल्याचे कारणही निवड समितीने  मला दिले नाही, असेही तो म्हणाला.
 
अकिब जावेदने दिलेल्या मुलाखतीनंतर मॅच फिक्सिंगबद्दल काही गोष्टी त्याने समोर आणल्या आहेत. जावेद पाकिस्तानकडून 22 कसोटी आणि 162 कसोटी सामने खेळला असून त्याने अनुक्रमे 54 आणि 182विकेट्‌स मिळवले होते. याबाबत अकिब म्हणाला की, माजी क्रिकेटपटू सलीम हे संघातील खेळाडूंच्या संपर्कात असायचे. मॅच फिक्सिंग करण्यासाठी महागड्या गाड्या आणि करोडो रुपये ते खेळाडूंना द्यायचे. माझ्यापुढेही त्यांनी मॅच फिक्सिंगचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मी नाकारला होता. त्यावेळी हा प्रस्ताव नाकारला तर तुला संघात घेणार नाही, अशी धमकीही त्यांनी मला दिली होती. पण मी मॅच फिक्सिंगचा प्रस्ताव नाकारला आणि तनंतर मला पाकिस्तानकडून खेळण्याची संधीच मिळाली नाही, असेही तो म्हणाला.
 
मॅच फिक्सिंगची कीड अजूनही क्रिकेटमध्ये कायम आहे आणि त्याचा वाईट अनुभव अजूनही येत आहे. हे अकिब जावेदच आरोपानंतर सिध्द होते.