बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (15:26 IST)

कर्णधार कोहलीपेक्षा जास्त आहे कोच शास्त्रीची कमाई, जाणून घ्या किती पगार आहे शास्त्रीचा

टीम इंडियाचे मुख्य कोच रवि शास्त्री यांच्या पगारात 20 टक्के वाढ होऊ शकते. शास्त्रीची वार्षिक सेलेरी किमान 10 कोटी रुपये होऊ शकते. सर्वात खास बाब म्हणजे हेड कोच शास्त्रीला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीपेक्षा जास्त पगार मिळणार आहे.  
महत्त्वाचे म्हणजे शास्त्रीचा कॉन्ट्रॅक्ट वर्ष 2021पर्यंत वाढवण्यात आला आहे ज्यामुळे त्यांची पगार देखील वाढेल. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा पगार 9.5 ते 10 कोटी रुपये होणार आहे.  
एका रिपोर्टने दिलेल्या वृत्ताप्रमाणे शास्त्रीला नवीन कॉन्ट्रॅक्टसोबत त्यांच्या पगारात 20 टक्के वाढ करण्यात आली आहे, ज्यावर बोर्ड देखील सहमत आहे. नंतर त्यांना 9.5 कोटी पासून 10 कोटी रुपये वार्षिक मिळणार आहे. या अगोदर कॉन्ट्रॅक्टप्रमाणे कोच शास्त्री यांना 8 कोटी रुपये वार्षिक देण्यात येत होते.  
 
तसेच, सपोर्ट स्टाफच्या सेलेरीत देखील वाढ झाली आहे. गोलंदाजी कोच भरत अरुणने आपला पद कायम ठेवला आणि त्याला आता किमान 3.5 कोटी वार्षिक देण्यात येतील. एवढाच पगार फिल्डिंग कोच आर श्रीधर यांना देखील मिळेल. त्याशिवाय टीम इंडियाचे नवीन फलंदाज कोच विक्रम राठोड यांचा पगार 2.5 ते 3 कोटीत असेल.  
 
सांगायचे म्हणजे विराट कोहलीला बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टप्रमाणे, वार्षिक सात कोटी रुपये मिळतात. बोर्डच्या सध्याच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे, विराट, रोहित आणि जसप्रीत बुमराह A+ लिस्टमध्ये सामील आहे. विराटप्रमाणे संघाचे त्यांचे जोडीदार ओपनर रोहित शर्मा आणि पेसर जसप्रीत बुमराहला देखील 7-7 कोटी देण्यात येतात.