शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (12:24 IST)

अनुष्का आणि विराटच्या घरी नाही एकही नोकर

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे एक स्टार कपल. हे कपल अगदी डाऊन टू अर्थ आहे. हो, नाव, पैसा, ग्लॅमर असे सगळे काही असूनही या दोघांचे पाय जमिनीवर आहेत. हे आम्ही नाही तर मजी क्रिकेटपटू शरणदीप सिंहांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. हो, विराट व अनुष्काच्या घरी नोकर नाही, असे त्यांनी सांगितले आहे. शरणदीप सिंह यांनी सांगितले, ‘अनुष्का व विराटच्या घरी मी नेहमीच जातो. त्यांच्या घरी कोणताच नोकर नाही. मी घरी जातो तेव्हा अनुष्का व विराट दोघेही आपल्या हाताने मला वाढतात. यापेक्षा आणखी काय हवे? विराट व अनुष्का तुमच्यासोबत बसतात, गप्पा करतात. तुमच्यासोबत डिनरसाठी बाहेर जातात. हेच तर हवे असते. ते दोघेही खूप डाऊन टू अर्थ आहेत.' या दोघांच्या घरी गेल्या 11 जानेवारीला कन्यारत्न जन्मले. आपल्या मुलीचे त्यांनी वामिका असे नामकरण केले आहे. वामिकाचे नाव विराट व अनुष्का या दोघांच्या नावाला जोडून ठेवण्यात आले आहे.
 
यात विराटचा ‘व' आणि अनुष्काचा ‘का' याचा समावेश आहे. वामिकाचा अर्थ होतो देवी दुर्गा. हे नाव दुर्गा देवीच्या नावापैकी एक आहे. विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. यदरम्यान दोघांमध्ये फ्रेंडशीप झाली आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले.