विराटच्या १० हजार धावा पूर्ण
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत जलद दहा हजार धावांची नोंद केली. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वन डेत त्याने दहा हजार धावा पूर्ण केल्या. तो जगातील १३ वा फलंदाज बनला.
सामन्याआधी त्याला दहा हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी ८१ धावांची गरज होती. २१२ व्या वन डेतील २०५ व्या डावात त्याने ही कामगिरी करीत सर्वांत कमी खेळींमध्ये अशी किमया साधण्याचा मान पटकविला. याआधीचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर होता. त्याने २५९ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. सौरव गांगुली (२६३ डाव), रिकी पाँटिंग (२६६), जॅक कालिस (२७२), महेंद्रसिंग धोनी (२७३) व ब्रायन लारा (२७८) यांनी दहा हजार धावांचा विक्रम केला आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेआधी विराटला २२१ धावांची गरज होती. गुवाहाटीत त्याने १४० धावा केल्या.