रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

महिला विश्वचषक क्रिकेट, भारताचा संघ जाहीर

भारतीय नियामक मंडळाने जूनमध्ये खेळल्या जाणार्‍या आयसीसीच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्तव मिथाली राजकडे सोपविण्यात आले आहे.
 
24 जूनपासून ही स्पर्धा सुरू होईल. दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत या दोघींनी दक्षिण आफ्रिकामध्ये खेळल्या जात असलेल्या चौरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विक्रमी सलामी दिली होती. या दोघीही या संघात आहेत. स्मृती मानधनाचा या संघात समावेश करण्यात आलेला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.
 
संघ: मिथाली राज, हरमनप्रीत कौर, वेदाकृष्णमूर्ती, मोना मेशराम, पूनम राऊतल दीप्ती शर्मा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्त, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकडवाड, पूनम यादव, नूझहत परवीन, स्मृती मानधना.