रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (10:31 IST)

World Cup: सचिन तेंडुलकर यांना मिळाले गोल्डन तिकीट,जय शाह यांनी विश्वचषकाचे निमंत्रण दिले

Sachin Tendulkar
World Cup: एकदिवसीय विश्वचषक भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. हा विश्वचषक खास बनवण्यासाठी बीसीसीआयने मोहीम सुरू केली आहे. त्यांनी देशातील नामवंत व्यक्तींना विश्वचषक पाहण्यासाठी आमंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. 'गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स' असे या मोहिमेचे नाव आहे. याअंतर्गत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांना वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी गोल्डन तिकिटे दिली जात आहेत. बॉलीवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचेही नाव या यादीत सामील झाले आहे.
 
बोर्डाचे सचिव जय शहा यांनी तेंडुलकरला गोल्डन तिकीट दिल्याची माहिती आहे. बीसीसीआयने लिहिले, “क्रिकेट आणि देशासाठी अभिमानाचा क्षण! आमच्या "गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स" कार्यक्रमाचा भाग म्हणून, BCCI सचिव जय शाह यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकीट प्रदान केले. राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेल्या सचिन तेंडुलकरच्या प्रवासाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. आता ते  आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चा भाग असणार आणि सामने थेट पाहणार आहे.