सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

कसोटी: गोलंदाजीत अश्विनची बादशाहत

भारतीय संघात गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेला फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने कसोटी गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, आयसीसीच्या अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीतही तो पहिल्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या शेवटच्या तिसर्‍या कसोटीआधी अश्विन आयसीसी ‍रँकिंगमध्ये तिसर्‍या क्रमांकावर होता पण इंदूरमध्ये त्याच्या फिरकीने कमालच केली. पहिल्या डावात 7 बळी घेऊन त्याने दाणादण उडवून दिली. त्याच्या या कामगिरीच्या मुहूर्तावर भारताने विजयाचे सोने लुटले.
 
इंदूर कसोटीत 13 आणि मालिकेत 27 विकेट घेणार अश्विन मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज ठरला. यानंतर,  लगेचच अश्विनला आणि टीम इंडियालाही आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे. आयसीसी रँकिंगमध्ये डेल स्टेन आणि जेम्स अँडरसनला मागे टाकत त्याने एक नंबरी झेप घेतली आहे. अश्विनच्या खात्यात तब्बल 900 गुण जमा आहेत.