शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

पक्ष्यांनाही लागली जंक फूडची चट

हिवाळ्यात आफ्रिका आणि उन्हाळ्यात उत्तरी युरोपात राहणारे क्रौंच आता आळशी झाले आहेत. ते अन्नाच्या शोधात उंच उडण्याऐवजी मानवी कचरा खाऊन काम चालवत आहे. हा काळचीचा विषय आहे.
जंक फूड आणि आरामदायक जीवन शैली केवळ मनुष्यात नव्हे तर पांढर्‍या क्रौंचमध्ये दिसायला लागली आहे. उत्तरी युरोपातील थंडीपासून वाचण्यासाठी क्रौंचची ही प्रजाती नैसर्गिक रूपाने शरद ऋतूत आफ्रिकेला रवाना होत होती. यासाठी पक्ष्यांना जिब्राल्टर सामुद्रधुनी ओलांडून 2,000 किलोमीटर उंच उड्डाण भरावी लागायची. पण मागील काही वर्षांपासून असे होत नाही. आता हे क्रौंच दक्षिण युरोपात थांबून हिवाळा पोर्तुगाल आणि स्पेन येथील कचर्‍यांच्या डब्यात घालवतात. 
 
तज्ज्ञ या गोष्टीमुळे हैराण आहे की सहज स्वभाव असलेल्या या पक्ष्यांमध्ये हा बदल का घडला असावा. ते हे जाणून घेयचा प्रयत्न करीत आहे की जंक फूड खाण्याची सवय जडलेल्या या पक्ष्यांमुळे पर्यावरणावर काय परिणाम होईल.
 
सर्वसाधारणपणे क्रौंच फ्रेबुवारीत आफ्रिकेहून परतून पोर्तुगाल, स्पेन आणि दुसर्‍या युरोपीय देशात जातात. येथे ते प्रजनन करायचे. आणि युरोपमध्येच राहायचे. ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान त्यांचा थवा युरोपहून निरोप घेऊन आफ्रिका परत येयचा.
 
स्वित्झर्लंड वन्यजीव सल्लागार होल्गर शुल्त्स यांच्याप्रमाणे, 'जर्मनीत राहणारे अधिकश्या क्रौंच पक्ष्यांनी आफ्रिका जाणे सोडले आहे.' परिणाम स्पष्ट आहे की युरोपच्या विभिन्न देशात राहणारे क्रौंच आता पोर्तुगाल आणि स्पनेच्या कचरा पेटीत मेजवानीचा आनंद लुटत आहे.
 
पण या पक्ष्यांच्या आहारात आलेल्या बदलमुळे जर एखादा नवीन रोग पसरला तर यांचे थवेचे थवे संपतील. तज्ज्ञांप्रमाणे कचरा पेटीत अधिकश्या विषारी तत्त्व असतात आणि पक्ष्यांचे आहारात हे सामील होत असल्यास पूर्ण इको सिस्टम धोक्यात येऊ शकतं.