रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

पुरुष जे बोलतात तेच त्यांच्या मनात असते का?

पुरुष अनेकदा पटकन काहीतरी बोलून जातात मात्र नंतर मला तसं काही बोलायचं नव्हतं असं बोलत परिस्थिती सावरत नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र एका अभ्यासातून असं समोर आलंय की, खरंच बहुतांशी पुरुषांना जे बोलायचं असतं त्याचा अर्थ नेमका तोच असतो असं नाही.
 
डिकोडिंग मेन या सोशल मीडियाने केलेल्या अभ्यासात हे आढळून आलंय. यावेळी पुरुषांना काही प्रश्न विचारण्यात आले. एखादा वाद टाळण्यासाठी पुरुष त्या मुद्द्याशी सहमती दर्शवतात का असे विचारले असता 90 टक्के पुरुषांनी हो असं सांगितलं. 
 
एखादा प्रश्न विचारल्यावर पुरुष नंतर सागतो असं म्हणतात याचा अर्थ ते सांगण्याचं टाळत नाही अथवा त्यांना कमेंट द्यायची नसते असा होत नाही, असे या अभ्यासातून दिसून आलेय.