शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2016 (13:17 IST)

फुलपाखरांच्या पंखांवरील डोळ्यांच्या नक्षीचे गुपित उलगडले

फुलपाखरांच्या जनुकीय संपादनातून त्यांच्या पंखावरील उमटणार्‍या हुबेहूब डोळ्यांच्या आकाराच्या ठिपक्यांच्या नक्षीचे गुपित उलगडले आहे. कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांनी हे रहस्य शोधून काढले आहे. फुलपाखरांच्या किंचितशा जनुकीय बदलाने त्यांच्यावरील या ठिपक्यांमध्ये कसा बदल घडतो ते त्यांनी दाखवून दिले. या संशोधनाचा फायदा फुलपाखरांची उत्क्रांती कशी झाली याचे गूढ उकलण्याकरता होणार आहे. फुलपाखरांच्या पंखावर नेमक्या कशाप्रकारे विविध प्रकारची नक्षी निर्माण होते. त्यामध्ये कसे बदल घडतात. ते नेमके कशामुळे घडतात या गोष्टींचा शोध घेण्यासाठी नवीन संशोधनाचा उपयोग होणार आहे.
 
संशोधकांनी नवीन जिनोम संपादन पद्धतीने याचा शोध लावला. यामध्ये काही जिन्स बदलण्यात येतात. तर काही जीन्स काढून टाकण्यात येतात. त्यामुळे या ठिपक्यांमध्ये बदल घडून आल्याचे दिसून येते.
 
या संदर्भातील अभ्यास निबंध नेचर कम्युनिकेशन्स या सायन्स जर्नलमध्ये छापून आल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.