रविवार, 5 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By संदीप पारोळेकर|

ब्लॉग विश्वातील भोचक हरपला..!

WD
'पत्रकार' असल्यानजीवनाच्यप्रत्येक्षेत्राभोचकपणडोकावण्याचव्यवसायसिध्अधिकारयांनमिळालेलअसत.... कामाचजबाबदारसांभाळून ''मिसळपाव'', ''ममराठी'', ''मायवेबदुनिया'' अशवेगवेगळ्यसाईट्सवआपल्यजगण्याचे, अनुभवांचचित्रंगवूवाचकांनवेगवेगळ्यविषयांवरीलेखांचचविष्ट ''मिसळ" देणारा 'भोचक' (अभिनकुलकर्णी) आब्लॉग विश्वातूहरपलआणि कुटुंबीयासमित्परिवाराच्यकाळजालकायमचचटकलावूगेला. आतभोचकचनवपोस्कधीदिसणानाही... वत्याचलिंकहआतकुणालआपल्यमेलबॉक्समध्यसापडणानाही... आतशोधावलागेकाळजाच्यकोपर्‍यात... आठवणींच्यहिंदोळ्यात...

गेल्या दोन वर्षांपूर्वी इंदूर स्थित मराठी वेबदुनियामध्ये मी रजू होण्यासाठी गेलो. इंदूर शहर माझ्यासाठी नवीन होतं. कामावर रुजू होताना अभिनय कुलकर्णी यांच्याशी माझी ओळख झाली. ते माझे सिनियर होते. ते नाशिकचे असल्याचे कळले. त्यामुळे आपलं येथे कुणी नाही, अशी म्हणण्याची तरी वेळ माझ्यावर आलेली नव्हती. इतका मी पहिल्या भेटीतच त्यांच्या जवळचा झालो होतो. ते सोबत असताना आपण परक्या शहरात आलो आहे, हे दोन वर्षात मला कधीच जाणवले नाही. ते सिनियर, होते म्हणून मी त्यांच्याशी बोलायला घाबरायचो. मात्र अभिनय सरांचा स्वभाव ग्रेटच होता. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे मराठी भाषाच काय तर वेबदुनियाच्या अन्य भाषांच्या सहकार्‍यांचेही मने त्यांनी जिंकले होते. सिनियर असल्याचा गर्व त्यांच्या चेहर्‍यावर कधी दिसला नाही आणि त्यांच्या वागणुकीतूनही तो कधी जाणवलाही नाही. उलट प्रत्येक गोष्टीत नवी माहिती आम्हा सहकार्‍यांना त्यांच्याकडून मिळत असे. ते नेहमी अडल्या नडलेल्यांना ते मदत करीत.

गेल्या वर्षाचीच घटना... मी खंडावा रेल्वे स्थानकाजवळ चालत्या रेल्वेतून खाली पडलो, तेव्हा ते मोठ्या भावाप्रमाणे माझ्या मदतीला धावून आले. मला हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले. मला त्यांच्या घरी ठेवलं... माझी काळजीही घेतली. आजच्या धावत्या जगात असा माणूस पुन्हा मला कधी भेटल काय? यासाठी चांगलं नशीब असावं लागतं. असेच म्हणावे लागेल. मी गावी जाताना मिळेल त्या गाडीने रात्री बे रात्री पोहचायचो. 'कशाला एवढी रिक्स घेतोस?', असे ते नेहमी म्हणायचे. आज हेच वाक्य माझ्या कानाभोवती पिगा घालतंय...

....भोचक हरपला!
''भोचक'' या टोपन नावाने त्यांचा ब्लॉग अल्प काळातच प्रसिध्द झाला. "मिसळपाव'', "मी मराठी", ''ब्लॉगस्पॉट", ''मायवेबदुनिया", अशा वेगवेगळ्या इंटरनेट साइट्सवर त्यांनी केलेलं लिखाण जगाच्या पाठीवर सर्वत्र वाचलं जायचं. वाचकांच्या प्रतिक्रिया त्याच्या ब्लॉगवरून ओसंडून वाहायच्या... काही वाचकांची तर त्यांच्या राजकीय विषयावरील लेखांवरून जुगलबंदीही चालायची. यातुन त्यांची लेखनी किती दर्जेदार होती व त्यातील मुल्य स्पष्ट होतं. तरुणाईला आकर्षित करणारे त्यांचे लिखाण असायचं. "माझं इंदूर आख्यान" हे त्याचं ई- बूक नुकतच प्रकाशित झालं होतं. त्यात त्यांनी इंदूर शहरातील हिंदी मिश्रीत मराठी भाषेचा गोडवा गायलाय. मराठी शब्दाचा हिंदी उच्चर करतांना अनेक लेखांमध्ये त्यांनी हश्या पिकविलाय तर "माय मावशी आणि माझी लेक", या लेखात तर त्यांची मुलगी अभिश्री उर्फ अनवा हिचे गोड कौतुक त्यांनी केले आहे. मी तयार केल्याली लेख त्यांच्याकडून तपासून घेत असे. ते सिनिअर या नात्याने माझ्या चुकांची दुरुस्ती करून मला योग्य मार्गदर्शन करीत. एवढेच नव्हे तर काही लेखातील मुल्य शोधून त्यांची ते पुर्नंबांधणीही करीत. ते इंदूरात राहात पण त्यांचा मित्रपरिवार हा संपूर्ण महाराष्ट्रात होता. ब्लॉगच्या माध्यमतून त्यांनी तर प्रत्येक क्षेत्रातील माणूस जोडला होता. देशी-परदेशी मित्र बनविले होते.

सतत भटकणारा भोचक...
पत्रकारितेचे व्रत स्विकारलेले अभिनय कुलकर्णी यांना भटकंतीचा छंद होता. फावल्या वेळात ते आपल्या फॅमिलीसोबत इंदूर भटकायचे... शहरातील विविध स्थळांना भेटी द्यायचे. सुटीच्या दिवशी इंदूरच्या आसपास असलेल्या ऐतिहासिक वास्तूंना भेट द्यायचे. मांडव गड, पंचमढी, माहेश्वर, महाकालेश्वर आदी ठिकाणांपासून तर इंदूर शहरातील कान्याकोपर्‍यातील ठिकाणे त्यांनी माहिती करून घेतली होती. मात्र आता भविष्यात असा हरहुन्नरी माणूस भेटेलच हे कशावरून... नियतीचा खेळ अजब आहे. दि.२० जुलैला ते इंदूरहून मुंबईला येतांना काळाने त्याच्यावर झळप घालून त्यांना आपल्यातून हिरावून नेलं. आता त्यांच्या केवळ आठवणीच आपल्याकडे शिल्लक आहेत. ते जेव्हा आठवतील तेव्हा त्यांच्या गेल्याचे दुःख सहन होणार तर नाहीच अन् अश्रुंचा पाऊसही आवरता येणार नाही.... हिच श्रध्दांजली स्वीकारा सर..!

- संदीप पारोळेकर

अभिनय कुलकणीँ यांचे प्रसिद्ध मराठी ब्लाक

भोचक

माझं इंदूर आख्यान - पुस्त