म्हैसूरच्या राजाने छापल्या सोन्याच्या लग्नपत्रिका
राजस्थानच्या शाही घराण्यातील हर्षवर्धन सिंह यांची मुलगी त्रिषिका कुमारी हिच्यासोबत प्रमोदा देवी वाडियार यांचा दत्तक पुत्र असलेला यदुवीर क्रिश्नदत्त चामराजा वाडियार याचे लग्न होत असून या लग्नात आमंत्रित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या व अति महत्त्वाच्या पाहुण्यांना सोन्याचा मुलामा चढवलेल्या आमंत्रण पत्रिका देण्यात आल्या आहेत. 21 ते 27 जूनदरम्यान हा लग्नसोहळा आंबाविलासा पॅलेस येथे पार पडणार असून तब्बल 40 वर्षानंतर वाडियार कुटुंबात हा लग्नसोहळा पार पडणार असल्याने हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राजस्थानच मुख्यमंत्री वसुंधराराजे, कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वरम, अंबरीश, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, एस एम कृष्णा, यांसह चित्रपट सृष्टीतील तारे-तारका, क्रिकेटर, व्यावसाकिांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.