शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (20:41 IST)

सकाळी उठल्यावर मोबाइल वापल्याने....

सकाळी उठल्यावर तुमचा हात सर्वप्रथम मोबाइलकडे जातो का, सोशल मीडिया, ईमेल्स बघितल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरूवात होत नाही का, या प्रश्नांची उत्तरे ‘हो’असतील तर तुम्ही सावध  व्हायला हवे. असे केल्यामुळे तुमचे बरेच नुकसान होत आहे हे लक्षात घ्या. 
 
मध्यंतरी ब्रिटनमध्ये दोन हजार लोकांवर एक सर्वेक्षण करण्यात आले. सकाळी उठल्यानंतर मोबाइल फोन बघणार्‍यांच्या दिवसाची सुरूवात ताणाने होत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले.
हे लोक दिवसभर तणावात राहातात आणि त्यांना दैनंदिन कामे करताना अडचणी येत असल्याचेही हे सर्वेक्षण सांगते.
 
सकाळी मोबाइलमधले संदेश वाचल्यानंतर आपले मन त्यांचाच विचार करते. याचा कामावर विपरीत परिणाम होऊ लागतो. आपली कार्यक्षमता कमी होऊ लागते. दिवसभर एकाच गोष्टीचा विचार करत राहिल्याने ताण वाढतो. शिवाय अस्वस्थताही जाणवते. वर्तमानाऐवजी आपण भूतकाळाचा विचार करू लागतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल बघू नये, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
अभय अरविंद