सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (20:22 IST)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा !!!

जशी परिस्थिती आली तसें ते वागले,
ज्या स्थितीत जुळवून घ्यायचे तिथं जुळवले,
त्यामुळे त्यांची सिद्धता कमी होतं नाही,
मिळवलेल्या गुणांना तुच्छ लेखता येत नाही,
उलटे कौतुक करावं, यांही स्थितीत सामोरे गेले,
मिळालेल्या ज्ञानावर, विश्वास करते झाले,
कुरबुर केली नाही, आळसवून बसले नाही,
पुढं आहेतच की परीक्षा, ही शेवटची नाही!
जातीलच पुढं पुढं ज्यांना जायचे आहे,
धीराने आपण घेण्याची ही वेळ आहे!
खचू नका देऊ या तरुण जीवांना जराही,
उमेद खचू देऊ नका, उडता येईल त्यांनाही!!
.....सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा !!!
...अश्विनी थत्ते