.....काव्य दीनाच्या सर्व कवींना शुभेच्छा!!
इतरांना जे दिसत नाही ते दिसे कवीला,
छोट्या छोट्या गोष्टी भिडतात हो मनाला,
कधी रम्य कल्पना डोक्यात रुंजी घालतात,
कोणाचे शब्द जीवास घोर लावतात,
कधी निसर्गात दिसतो शब्दांचा विस्तार,
रोजच्या जीवनातून ही मिळे काव्यास आधार,
कसें अन कुठं काव्य बहरेल ते उमजेना,
मिळताच विषय , ते उमलतेच कसे सर्वास समजेना,
कसं ही असो, कुणाचे ही शब्द असोत,
काव्य स्फुरण महत्वाचं,भले ते कुणी ही करोत.
.....काव्य दीनाच्या सर्व कवींना शुभेच्छा!!
अश्विनी थत्ते