Dharma Sangrah
✕

वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते?

Updated: सोमवार, 4 जून 2018 (13:27 IST)
सारा पसारा उघड्यावर
पारंपरिक अथवा अपारंपरिक स्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून निर्माण झालेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी लाखो किलोमीटर वीजवाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला 'ग्रीड' म्हणतात. हा सारा पसारा उघड्यावर आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारातजातात, तर कधी हा बिघाड गाव किंवा काही भागापुरता मर्यादित असतो.
 
पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळवारे व आकाशाच्या विजेतील कडकडाट सर्वांनी अनुभवलेला आहे. तारेच्या जाळ्यांमधून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज... दोन्हींमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की, घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण, उच्च दाबामुळे ती जळण्याची शक्यता असते. दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते. नव्हे, तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते.
हानी टाळण्यासाठी यंत्रणा
दुसरी बाब म्हणजे वीज खांबात विद्युतप्रवाह उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर खांबावर बसविले जातात. बहुधा ते उन्हामुळे किंवा विद्युतप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात, ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लगेचच आपात्कालिन यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर (वीजवाहिनी) बंद पडतो. जर हा फीडर बंद पडला नाही तर जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो.
बिघाड शोधणे जिकिरीचे
जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही, याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फीडर चालू केला जातो. जर फीडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते. तथापि, बिघाड शोधणे जिकिरीचे असते. ऊन-वाऱ्याची, पावसाची अथवा अंधाराची तमा न करता ही शोध मोहीम हाती घेतली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात, तर कधी हा बिघाड काही खांबांदरम्यान सापडतो.
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग
लष्करातील जवानाला युद्धाचा सराव दररोज करावा लागतो. परंतु, युद्ध करण्याची वेळ सहसा येत नाही. इथे मात्र वीज कर्मचारी रोज युद्धभूमीवर असतात. चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ बांधूनच त्यांना खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारची काळजी घेऊनही वीज कर्मचाऱ्यांना प्राणांतिक अपघात होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. परंतु, मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की, एखाद्याच्या जिवाचे मोलही आपण ध्यानात घेत नाही. वीज जाते आणि येते, यादरम्यान काय होते, याचा विचार आपण जेव्हा करू त्यावेळी आपण महावितरण किंवा कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला दोष देणार नाही.
 
वीज गेल्यास काय करावे आणि काय करू नये?
1.आपल्या घरात ईएलसीबी (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.
2.अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.
3.वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.
4.वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.
5.विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.
6.वीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा.
7.बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा.
8.विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. तातडीने महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाला अथवा १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर माहिती द्यावी.

- ज्ञानेश्वर आर्दड,
जनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती परिमंडल

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

मी माझ्या गावी जात आहे, सुटकेनंतर अभिजीत दीपकेची पोस्ट, सीजेपी मागे हटणार नाही

LIVE: नवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन पाळत आणि सहा ठिकाणी नाकाबंदीसाठी

मुंबईतील सांताक्रूझमध्ये लग्नाच्या खरेदीसाठी ठेवलेले १० लाख रुपये चोरून कारचालक फरार

नेपाळमधील बुढी गंडकी नदीसाठी पुराचा इशारा, गावे रिकामी करण्याचे आदेश, अनेक घरे आणि पूल वाहून गेले

देवबंदमध्ये भीषण रस्ते अपघात; कुशावली येथील चार भाविकांचा मृत्यू, १२ जण जखमी

पुढील लेख
Show comments