गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

मुंबईत पुस्तक दान सोहळा आयोजित

रत्ननिधी आणि अलिबाबाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पुस्तक दान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे हे ४ थे वर्ष आहे. 
 
डॉ. स्वरूप संपत रावल यांच्या हस्ते या मिशन मिलियन बुक्स सोहळ्याचे उद्घाटन. 
 
Google.org grantee रत्ननिधी ट्रस्ट ही शिक्षण केंद्रित उपक्रम आणि दिव्यांगांसाठी काम करणारी मुंबईतील सामाजिक संस्था आणि अलिबाबा समूह, चायनीज मल्टिनॅशनल कॉमर्स, रिटेल आणि टेकनॉलॉजी यांनी एकत्रितपणे मिशन मिलियन बुक्स ही जागतिक पातळीवरील पुस्तक दान मोहिम चालवत आहेत.
 
मिशन मिलियन बुक्स या कॅम्पिंन अंतर्गत ४ था पुस्तक दान सोहळा २२ एप्रिल २०१८ रोजी पार पडला. २०१६ व २०१७ मध्ये सातारा, बारामती आणि मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच हा कार्यक्रम होता.
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळच्या नियंत्रण समितीच्या सदस्य, डॉ. स्वरूप सामंत रावल यांनी या सोहळ्याचे उद्घाटन केले. भारतात आणि महाराष्ट्रात शिक्षणाला प्राधान्य दिले जात असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहणं ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. सध्याच्या डिजीटल युगातही मी पुस्तक वाचण्यालाच प्राधान्य देते. तो आनंद वेगळाच असतो. पुस्तक आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात. इथे जमलेल्या मुलांनी पुस्तकांविषयी नॉवेल ही घेतली पाहिजे ती पुस्तक तुम्हाला एका सुंदर जादुई विश्वात नेतात, तुमच्यातील कल्पकता जागृत करतात आणि म्हणूनच अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनही झाले पाहिजे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. 
 
यावेळी डॉ. रावल यांनी पुस्तक प्रदर्शनात फेरफटका मारत वेगवेगळ्या पुस्तकांबाबत माहिती घेतली. त्यांच्यासोबत रत्ननिधी ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता, अलिबाबा डॉट कॉम - स्ट्रॅटेजिक पार्टनरचे वरीष्ठ उपाध्यक्ष विनय भारतीय, रत्न निधी ट्रस्टच्या संस्थापिका आशा मेहता आणि आयआयटी मुंबईचे प्रा. बी. रवी यांनीही यावेळी प्रदर्शनाची माहिती घेतली.
 
वाचन हा आपल्या मेंदूसाठी एक व्यायामच आहे. आपल्या देशातील अनेक हुशार आणि चौकस मुलं व तरुणांसाठी हव्या त्या प्रमाणात चांगल्या दर्जाचं वाचनीय साहित्य उपलब्ध नाही ही वाईट गोष्ट आहे. म्हणूनच आम्ही मिशन मिलियन बुक्स ही संकल्पना राबवत आहोत. देशातील तरुण मुलांना चांगल्या दर्जाचं वाचनीय साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अगदी कमी कालावधीत आम्ही ७ लाखांपेक्षा अधिक पुस्तक जमा केली आणि भारतातील २००० पेक्षा अधिक शैक्षणिक संस्थांमधील विद्याथ्र्यांना २.५ दशलक्ष पुस्तक देण्यात आली, असे मत अलिबाबा डॉट कॉम - स्ट्रॅटेजिक पार्टनरचे वरीष्ठ उपाध्यक्ष विनय भारतीय यांनी व्यक्त केले. 
 
आम्हाला दिवसाला साधारण ५००-१००० इतकी पुस्तक प्राप्त होत आहेत. या वेगाने २०१८ या संपूर्ण वर्षात आम्ही लाखो पुस्तकांची सीमा गाठू. आमच्या सर्व भागीदाराचे आम्ही आभारी आहोत. या चौथ्या वर्षातील उपक्रमात पुस्तकांसाठी बॅग पुरवणं आणि पुस्तकांच्या वाहतूकीचा खर्च पेलणं आम्हाला शक्य झालं, याचा आम्हाला आनंद होत आहे. असे मत यावेळी रत्ननिधी ट्रस्टचे विश्वस्त राजीव मेहता यांनी व्यक्त केले. 
 
या कार्यक्रमाला १००० पेक्षा अधिक शाळा मुख्याध्यापक उपस्थित होते. पुस्तक घेताना या मुख्याध्यापकांच्या चेहर्‍यावर अवर्णनीय आनंद व्यक्त होत आहे, अशी सुखद टिपण्णी आयआयटी - मुंबईचे प्राध्यापक बी. राव यांनी केली. 
 
फिजिक्स (भौतिकशास्त्र), केमिस्ट्री (रसायनशास्त्र), जीवशास्त्र, गणित, विज्ञान, कम्प्युटर, भूगोल, इतिहास, शब्दकोष, एनसायक्लोपिडीया, कथा - कादंबरी, बिझनेस (व्यवसाय), व्यवस्थापन, गोष्टींची पुस्तकं, मानवता आणि धर्म, पौराणिक या विषयांवरील पुस्तकं, बालसाहित्य, मासिकं   अशी विविध प्रकारची पुस्तक या दान सोहळ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. 
 
गुगल डॉट ओआरजी ग्रांटी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टबाबत
 
रत्नानिधी ट्रस्टचे संस्थापक महेंद्र मेहता आणि गुजरातचे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतानाचे २००९ मधील संग्रहित छायाचित्र. दिव्यांगांकरीताच्या प्रâी मोबेलिटी वॅâम्पसाठी गुजरातचे हे मुख्यमंत्री जास्तीत जास्त प्रयत्नशील राहिले. दिवंगत प्रिन्सेस डायना ट्रस्टद्वारे महेंद्र मेहता यांना मानाचा मानवतावादी रोझ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
रत्न निधी ही संस्था १९९० पासून कार्यरत आहे. त्यांचे हे काही उपक्रम. 
- ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य अलिबाबा या कंपनीसह रत्न निधी संस्था जगातील सगळ्यात मोठा मिशन मिलियन बुक्स हा पुस्तक दान उपक्रम राबवते.
- माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अण्णा हजारे, किरण बेदी, उदीत राज, रामदास आठवले आणि श्री रतन टाटा अशा मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या कामाला पाठिंबा दिला आहे.
- रत्न निधी ही ऑर्थेटिक्स आणि प्रोथेटिक्स स्वरूपातील (अवयवदान, त्वचादान अशा स्वरूपातील दान) दान वा मदत उपलब्ध करून देणारी जगातील प्रमुख संस्था आहे. भारतात त्यांनी स्वतंत्ररित्या २.४८ लाखांपेक्षा अधिक संख्येत जयपूर फूट, पोलिओ क्लिीपर्स, व्हीलचेअर्स, पाळणा अशा स्वरूपाची मदत देऊ केली आहे.  
-  ही संस्था मागील १५ वर्षे मुंबईत रोज सकाळी माध्यान्ह भोजन पुरवते. या उपक्रमाद्वारे त्यांनी २३ दशलक्षापेक्षा अधिक भोजन पुरवले आहे. 
- मार्च २०१८ पर्यंत संस्थेने गरीब आणि गरजूंना १.१० दशलक्षापेक्षा अधिक कपडे पुरवले आहेत. 
- मार्च २०१६ मध्ये, दिव्यांगांना तंत्रज्ञानाद्वारे मदत उपलब्ध करून देणार्‍या उपक्रमातील अतुलनीय कार्याकरीताच्या पुरस्कारासाठी गुगलद्वारे रत्न निधी ट्रस्टची निवड करण्यात आली होती.  
अलिबाबा समूहाबाबत
व्यवसाय करणं कुठेही सहजसोपं व्हावं हाच अलिबाबा समूहाचा उद्देश आहे. ही ऑनलाइन आणि मोबाइल कॉमर्स क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी आहे. १९९९ मध्ये स्थापित झालेली ही कंपनी टेक्नोलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मार्केटिंग सेवा पुरवते. याद्वारे अगणित ग्राहक आणि इतर व्यवसायांना ऑनलाइन सेवा दिली जाते.