गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (15:13 IST)

"जागतीक निद्रा दिनाच्या शुभेच्छा"!

झोप ...आहाहा एक स्वर्गीय आंनद,
किडा मुंगी पासून सर्वांना परमानंद,
एका सुखद प्रवासाचा अनुभव सुंदर,
एक छानसं स्वप्न अलगद पापण्यांवर,
पैश्याने मिळत नसे झोपेचं सुख महान,
पापण्या मिटता क्षणी,यायला च हवी छान,
न कोणती चिंता, न कोणते संकट,
गाढ निद्रेत प्रत्येक कोडी सुटतात पटापट,
सुखी जीवनाचा मूलमंत्र हाच असावा,
गाढ निद्रेचा अनमोल ठेवा प्रत्येकाला मिळावा!
"जागतीक निद्रा दिनाच्या शुभेच्छा"!
अश्विनी थत्ते.