गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. गुरूमंत्र
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (08:45 IST)

अभ्यास करताना झोप येते, मग हे उपाय करा

आजच्या काळातअभ्यास  करणे महत्त्वाचे आहे. या मुळे माणूस प्रगती करतो आणि आयुष्यात काही तरी बनतो. सध्याच्या काळात नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थींना खूप परिश्रम घ्यावे लागत आहे. आपले मुलं अभ्यास करून चांगले शिकावे आणि आयुष्यात पुढे वाढावे हीच प्रत्येक पालकांची इच्छा असते. या साठी पालक मुलांना उच्च शिक्षण मिळविण्याच्या धडपडीत असतात. मुलांना अभ्यासासाठी बसवतात. परंतु मुलांना अभ्यास करताना झोप येते. या मुळे ते अभ्यास करू शकत नाही. अभ्यास करताना झोप कशी घालवायची या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
 
1  नेहमी ताठ बसून अभ्यास करा-
आपली इच्छा आहे की अभ्यास करताना झोप येऊ नये. या साठी अभ्यास झोपून करू नये. नेहमी ताठ बसून अभ्यास करावा.झोपून अभ्यास केल्याने झोप येते म्हणून नेहमी ताठ बसून अभ्यास करावा.
 
2 अभ्यास करताना नेहमी नोट्स बनवा-
अभ्यास करताना नेहमी नोट्स बनवून ठेवा. या मुळे मुलाचे लक्ष अभ्यासात लागेल आणि ते नोट्स परीक्षेला देखील कामी येतील. आपण या नोट्समुळे कमी वेळात पूर्ण रिव्हिजन करू शकाल. नोट्स बनविल्याने झोप येणार नाही. 
 
3 झोप आल्यावर कॉफी प्या-
जेव्हा आपण अभ्यासाला बसता तेव्हा थकवा आणि झोप येते, या वेळी कॉफीचे सेवन करावे. जेणे करून आपण ताजे तवाने अनुभवाल आणि झोप देखील येणार नाही. 
 
4 झोप आल्यावर थोडं फिरून घ्या-
 बऱ्याच वेळ एकाच ठिकाणी बसून बसून अभ्यास करून  कंटाळा आल्यामुळे झोप येत असेल तर थोडं फिरून पाय मोकळे करावे. या मुळे आपल्याला झोप येणार नाही आणि आळस देखील दूर होईल. 
 
5 झोप आल्यावर व्यायाम करा-
जर आपण जास्त काळ अभ्यास करता तर आपल्याला झोप येऊ लागते. अशा परिस्थितीत 2-3 मिनिटे कोणते ही व्यायाम करावे. या मुळे आपल्याला झोप येणार नाही.